3.37 लाख रुपये किमत: 3 प्रकारात केली सादर
वृत्तसंस्था/ चेन्नई
रॉयल एनफिल्ड यांची नवी क्लासिक 650 ही मोटारसायकल भारतीय बाजारामध्ये नुकतीच लाँच करण्यात आली आहे. या मोटारसायकलची किंमत 3.37 लाख रुपये (एक्स शोरूम, चेन्नई) असणार आहे. सदरच्या मोटारसायकलच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. लवकरच या गाडीच्या वितरण प्रक्रियेलाही प्रारंभ केला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
3 प्रकारात मोटारसायकल लाँच
कंपनीने ही मोटारसायकल हॉट रोड, क्लासिक व क्रोम अशा तीन प्रकारांमध्ये सादर केली असून या तिन्ही मोटारसायकलींची किंमत अनुक्रमे 3.37 लाख, 3.41 लाख, 3.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या गाडीमध्ये टीअरड्रॉप शेपड् फ्युएल टॅंक दिला असून 648 सीसी पॅरलल ट्वीन, एअर /ऑइल कुल्ड इंजिन देण्यात आले आहे.
काय आहेत सुविधा
19 इंची फ्रंट आणि 18 इंची रियर वायर स्पोक व्हील्स देण्यात आल्या असून 320 एमएम फ्रंट डिस्क आणि 300 एमएम रियर डिस्क ब्रेक दिले गेले आहेत. 14.8 लिटरची इंधन टाकी असून 243 किलो ग्रॅम इतके वजन आहे. अनेक आधुनिक वैशिष्ट्यो या गाडीत समाविष्ट केली असून त्यामध्ये एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्पचा समावेश आहे. त्याचबरोबर अॅनालॉग डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरही दिला असून यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्टही या गाडीत आहे.









