गोडोली / प्रतिनिधी :
Satara News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे. शहराच्या पुर्व भागात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाकडून यानिमित्ताने शाही दरबार मिरवणूक काढण्यात येणार असून भगवे फेटे आणि भगव्या साडीत तब्बल ३ हजार महिला, उंट घोडे, मर्दानी खेळ, १२० ढोल ताशे असणारे पथक, लेझीम पथक, डिजे आवाज घुमणार आहे. यावर्षीच्या शिवजन्मोत्सवात लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, माध्यम प्रतिनिधीं सहभागी होणार असल्याचे संयोजक समाजसेवक फिरोजभाई पठाण यांनी तरुण भारत शी बोलताना सांगितले.
राजधानी साताऱ्यातील गतवर्षीच्या शिवजन्मोत्सवाची चर्चा सर्वदूर पोहोचली होती. याही वर्षीचा हाच जन्मोत्सव ऐतिहासिक राजधानीचा लौकिक वाढविणार आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाकडून जानाई मळाई मंदीरापासून ते गोडोली नाका ते हॉटेल अजंठा चौक ते फॉरेस्ट कॉलनी मार्गे कल्याण पार्क अशी अतिशय नियोजनबद्ध शाही दरबार मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यात विलासपूर, गोळीबार मैदान, गोडोली परिसरातील सर्व महिला भगवे फेटे आणि भगव्या साडीत सहभागी होत आहेत. उंट, घोडे , लेझीम पथक, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, डिजे तर १२० ढोल ताशे असणारे पथक या मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. या मिरवणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जयेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, तरुण भारत आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७ ते १० यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाजसेवक फिरोजभाई पठाण यांनी सांगितले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









