वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023-24 च्या फुटबॉल हंगामातील कनिष्ठ मुलांची डॉ. बी. सी. रॉय चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा त्याचप्रमाणे कनिष्ठ मुलींची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा सप्टेंबर महिन्यात ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आयोजित केल्याची घोषणा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने केली आहे.
कनिष्ठ मुलांची ही स्पर्धा 5 ते 15 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या दोन्ही गटात प्रत्येकी 16 संघांचा समावेश असून ते चार गटामध्ये विभागण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. कनिष्ठ मुलींची फुटबॉल स्पर्धा 20 सप्टेंबरपासून सुरू होईल. 2019-20 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा पुन्हा घेतली जात आहे. मध्यंतरी कोरोना समस्येमुळे ही स्पर्धा तहकूब करण्यात आली होती.









