लसीकरणाच्या महत्त्वाबाबत दिली माहिती
बेळगाव : जनावरांना देण्यात आलेल्या विविध प्रतिबंधक लसीकरणाबाबत कंग्राळी खुर्द येथे जनजागृती करण्यात आली. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, समिती कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पशुपालकांना लाळ्या खुरकत, लम्पी आणि रेबिजबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठी फेरी काढण्यात आली. यावेळी पशुपालकांना वेळोवेळी जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करावे, अशी माहिती देण्यात आली. रेबीज, लम्पी आणि लाळ्या खुरकत लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. लम्पी आणि लाळ्या खुरकत जनावरांना तर श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचून घ्यावी, ही सुविधा मोफत देण्यात येते. याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही फेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केले आहे.









