प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरीची 64 वी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स नुकतीच पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रिकेटर व उद्योजक जी. आर. विश्वनाथ उपस्थित होते. रोटरी इंटरनॅशनलच्या अध्यक्षांचे प्रतिनिधी आर. वासु व कामाक्षी यांनी मार्गदर्शन करत रोटरीने पोलिओविरुद्ध चालविलेल्या अभियानाची माहिती दिली.
जी. आर. विश्वनाथ यांनी आपल्या क्रिकेट विश्वाविषयी सांगितले. यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रांतपाल वेंकटेश देशपांडे, माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, नासीर बोरसादवाला, शरद पै, माजी प्रांतपाल डॉ. सतीश धामणकर, संध्या देशपांडे यासह इतर उपस्थित होते.









