जागृतीसाठी कार रॅलीचे आयोजन
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ, रोटरी ई-क्लब ऑफ डिस्ट्रिक्ट व रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 18 रोजी एचपीव्ही लसीकरणाची मोफत मोहीम राबविली जाणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत आरपीडी क्रॉस येथील डॉ. उमदी क्लिनिक येथे हा कार्यक्रम होणार आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे.
रोटरी क्लब ऑफ साऊथचे अध्यक्ष डॉ. गोविंद मिसाळे, ई-क्लबच्या अध्यक्षा कविता कग्गणगी, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या विजयालक्ष्मी मन्नीकेरी यांच्या प्रयत्नांतून व स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनिता उमदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींना लसीकरण केले जाणार आहे. 9 ते 20 वयोगटातील मुलींसाठी लसीकरण केले जाणार आहे. महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पीयरच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 18 रोजी जागरुकता कार रॅली आयोजित करण्यात आली आहे. एचपीव्ही लसीच्या जागृतीसाठी कॅम्प येथील उभा मारुतीपासून सायंकाळी 5.30 वा. रॅली काढली जाणार आहे. आरपीडी येथील डॉ. उमदी क्लिनिकपर्यंत रॅली होणार आहे. यावेळी बेळगावच्या नागरिकांनी सहभागी होऊन कर्करोगाविरोधातील लढाईमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









