प्रतिनिधी/ बेळगाव
सावगाव रोडवरील अंगडी कॉलेज मैदानावर शुक्रवार दि. 3 पासून सुरू असलेल्या रोटरी अन्नोत्सव-2025 ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अन्नोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारीही नागरिकांनी गर्दी केली. ‘सांज द बँड’च्या सुमधूर संगीताचा आनंद घेत खवय्यांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. गायक कलाकारांनी संगीत कलाकारांच्या सोबतीने बॉलिवूडमधील गाणी सादर करीत सर्वांचे मनोरंजन केले.
अन्नोत्सवाची वेळ सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत असून 14 जानेवारीपर्यंत चालणार आहे. विविध नमुन्यांचे खाद्यपदार्थ, संगीत यांचा मनमुराद आनंद घ्या, आपली सायंकाळ अविस्मरणीय बनवा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









