उत्तर कर्नाटकातील सर्वात लांबीची मॅरेथॉन : पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावतर्फे 16 फेब्रुवारी रोजी 14 वी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. उत्तर कर्नाटकातील 42.195 कि. मी. ची सर्वात लांबीची ही मॅरेथॉन होणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. शरीर सुदृढ राहावे आणि नागरिकांना धावण्याविषयी प्रोत्साहन मिळावे यासाठी गो-ग्रीन या ब्रीदवाक्याखाली जागृती केली जाणार आहे. 42 कि. मी. बरोबरच 21 कि. मी., 10 कि. मी., 5 कि. मी., 3 कि. मी. लांबीची हाफ मॅरेथॉनही होणार आहे.
पहाटे 5 वाजता सीपीएड मैदानावरून या मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. विजेत्या पुरुष आणि महिला गटांसाठी स्वतंत्र बक्षिसे देऊन गौरविले जाणार आहे. रन इंडिया या वेबसाईटवर याबाबतची नोंदणी सुरू झाली आहे. गो-ग्रीन या ब्रीदवाक्याखाली टी-शर्टचे अनावरणही करण्यात आले आहे. यावेळी अॅथलिट आयर्न मॅन डॉ. सतीश चौलीगार, डॉ. मयुरा शिवलकर, संतोष शानभाग, टेनिसपटू तनिष्का काळभैरव, अपूर्वा खानोलकर, डॉ. संजू गुडगनट्टी, डॉ. नेत्रा सुतार, अमन नदाफ, विजयकुमार हिरेमठ, राजू नायक आदींच्या हस्ते टी-शर्टचे अनावरण झाले. यावेळी इव्हेंट चेअरमन कपिल काळभैरव, मल्लिकार्जुन मुरगुडे, उमेश रामगुरवाडी, महेश अनगोळकर, सोमनाथ कुडचीकर, डी. बी. पाटील आदी उपस्थित होते.









