प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनतर्फे पितृपक्षाचे औचित्य साधून शिवबसवेश्वर ट्रस्ट, देवराज अर्स कॉलनी येथील वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तांदूळ, तेल, डाळी, कडधान्य व इतर खाद्यपदार्थ असे मिळून एकूण 50 हजार रुपये किमतीचे साहित्य रोटरीचे अध्यक्ष उदयसिंग राजपूत व अनुपा राजपूत यांच्या हस्ते देण्यात आले.
अशोक मळगली यांनी मार्गदर्शन केले. रोटरीचे सेक्रेटरी वंदन बागी, नागेश मोरे, सतीश मिठारे, विजय पुजार, अशोक बदामी, दयानंद मळगली, राजू देशपांडे यांच्यासह इतर उपस्थित होते. वैजयंती चौगुला यांनी आभार मानले. यावेळी रोटरीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









