प्रतिनिधी /वास्को
रोटरॅक्ट क्लब वास्कोतर्फे ताज सेटस् एअर कॅटरिंग येथे आयोजित रोटरॅक्ट विभागीय पुरस्कार सोहळय़ात याशिका चेवली, मनस्वी दास व फरझीन जकात या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
मनस्वी, याशिका व फरझीन यांच्यासह इतर दोन खेळाडूंनी योगासने सादर केली. नुकत्याच हरियाणा येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्दपदक प्राप्त केले. याशिका व मनस्वी या जोडीने तालबद्द योगासन केले आणि रौप्य पदक पाप्त केले. रोटरॅक्ट क्लब वास्कोचे अध्यक्ष दत्तराज गावस व क्लबचे माजी अध्यक्ष रोहन बांदेकर, पुजा पाटील यांच्याहस्ते पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा रोटरॅक्ट प्रतिनिधी विशाख पेडणेकर, विभाग प्रतिनिधी रोहन नाईक, सचिव प्रियांका पंडित, राहुल यादव व रोटरॅक्टर क्लबचे सदस्य उपस्थित होते.









