बऱ्याच स्किन केअर प्रॉडक्ट्स मध्ये गुलाबाचा वापर केला जातो.त्वचा मुलायम बनवण्याचं काम गुलाब करतो. गुलाबाचे तेल सुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या सॉफ्ट आणि ग्लोइंग होते. जर तुम्हाला बाजारातून गुलाबाचे तेल विकत घ्यायचे नसेल तर तुम्ही ते घरी सुद्धा बनवू शकता.
जर तुम्हाला घरी गुलाबाचे तेल बनवायचे असेल तर तुम्हाला दोन ते तीन ताजे गुलाब लागेल. सोबत अर्धा कप ऑलिव्ह ऑईल घ्या. काचेच्या बॉटलमध्ये गुलाबाच्या पाकळ्या भरा. आता त्यात ऑलिव्ह ऑईल टाका आणि बॉटलचे झाकण बंद करा. एका खोलगट भांड्यात पाणी भरून गरम करा. जेव्हा पाणी गरम होऊ लागते, तेव्हा गरम पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि ऑलिव्ह ऑइलने भरलेले बॉटल ठेवा आणि सुमारे १५ मिनिटे राहू द्या. जेव्हा आतील तेल खूप गरम होईल आणि पाकळ्या त्यांचा सुगंध आणि रंग सोडतील तेव्हा गॅस बंद करा. ही बॉटल त्या गरम पाण्यात तोपर्यंत राहू द्या जोपर्यंत ते पाणी थंड होत नाही. तुमचे गुलाबाचे तेल तयार आहे. ते गाळणीने गाळून घ्या आणि तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये वापरा.
रोज त्वचेवर गुलाबाचे तेल लावल्याने टॅनिंग, एक्ने, पिंपल्स यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. त्यामुळे चेहऱ्यावरील इंफ्लेमेशनपासून आराम मिळते.
(वरील माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









