सांगली :
दि सांगली रोझ सोसायटी आणि मराठा समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १३ व १४ सप्टेंबरला सांगलीत गुलाब पुष्प प्रदर्शन आणि पुष्प रचना स्पर्धा २०२५ चे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती रोझ सोसायटीचे अध्यक्ष तानाजीराव चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. फुले आणि बागा पृथ्वीवरील स्वर्ग ही यंदाच्या प्रदर्शनची संकल्पना आहे. १३ रोजी सकाळी साडेआकराला जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्याहस्ते मराठा समाज भवन येथे प्रदर्शनाचे उद्घाटन व १४ रोजी सायंकाळी साडेपाचला जिल्हाधिकारी अशोक काकडे व सौ. शरदिनी अशोक काकडे यांच्याहस्ते प्रदर्शनाचे बक्षिस वितरण होणार आहे.
प्रदर्शनाचे यंदाचे ४७ वे वर्ष आहे. यंदा डिस्प्ले पुष्प मांडणी ही सर्वांसाठी आहे. यातील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिक व ट्रॉफी आणि सर्टीफिकेट देण्यात येणार आहे. गुलाबपुष्प प्रदर्शन स्पर्धा दोन गटात होईल. यात किंग ऑफ दि शो, क्वीन ऑफ दि शो यामध्ये संस्था व वैयक्तिक या सर्वांनाच भाग घेता येईल. प्रिन्स ऑफ दि शो व प्रिन्सेन्स ऑफ दि शो फक्त वैयक्तिक स्पर्धकांसाठी आहे. त्यांना फिरती ट्रॉफी व सर्टीफिकेट दिले जाईल. स्पर्धातील प्रमुख बक्षिसे जनरल चॅम्पियनशीप नानासाहेब चितळे जनरल ट्रॉफी, किंग ऑफ दि शो कै. व्यंकटराव हं. चव्हाण ट्रॉफी, बेस्ट डिस्प्ले कै. पद्माताई पुरोहित ट्रॉफी, कै. श्रीदेवी पाटील ही स्पर्धा सर्वासाठी आहे. यात गर्लेडिएटर, ग्रीन हाऊसमधील गुलाब जर्बेरा या तीन प्रकारात प्रत्येकी दोन बक्षिसे, ट्रॉफी व सर्टीफिकेट देण्यात येईल.
मतिमंद आणि मुकबधीर मुलांसाठी रोख रक्क्म व कै. डॉ. आप्पासाहेब चोपडे ट्रॉफी आणि सर्टीफिकेट, डॉ. भाटे १५ वर्षाखालील मुलांसाठी रोख रक्कम, ट्रॉफी व सर्टीफिकेट तर फुलांची रांगोळी मध्येही पाच बक्षिसे आहेत. बोनसाय डिस्प्ले ही स्पर्धा सर्वांसाठी आहे. यात फ्लोरिस्ट व फ्लॉवर डेकोरेटर यांच्या स्पर्धासाठी फिरत्या ट्रॉफीसह दोन बक्षिसे आणि उत्कृष्ट माळींना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्वागताध्यक्ष शहाजीराव जगदाळे, संस्थेचे मानद सचिव प्रकाश चव्हाण, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पी.वाय. मद्वाण्णा, मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन पाटील, उपाध्यक्षा डॉ. सुवर्णा पुरोहित, डॉ. विवेक शिराळकर समीर पाचोरे, ज्योती चव्हाण, नंदा झाडबुके, पद्मजा चौगुले, श्रेया भोसले, अतुल दप्तरदार, गीतांजली दप्तरदार, स्मिता दोशी, ए.डी. पाटील, विलासराव हिरूगडे पवार, गजानन पटवर्धन आदींनी संयोजन केले आहे.
- प्लास्टीक फुलांविरोधात मोहिम…!
दरम्यान लोकांनी प्लास्टीकच्या फुलांचा वापर न करता पर्यावरण, नैसर्गिक फुले फळे आणि शेतकरी यांचा विचार करून सर्व कार्यक्रमांत शेतात उत्पादीत होणारी फुलेच वापरावीत. यासाठी शाळांतील विद्यार्थ्यांना डेकोरेशनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती तानाजी-राव चव्हाण व अतुल दप्तरदार यांनी दिली.








