दोडामार्ग – वार्ताहर
साटेली-भेडशी येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच त्रिपुरा राज्याच्या रिझर्व्ह फोर्सने संचलन केले. येथील बाजारपेठेत सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रूट मार्च काढण्यात आला. ७ मे रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी हे संचलन करण्यात आले. यावेळी त्रिपुरा राज्याच्या रिझर्व्ह फोर्सचे जवान, दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांचा समावेश होता.
Previous Articleबहुजनांनी भाजपला पाठिंबा द्यावा
Next Article ताळगांव पंचायतीवर मोन्सेरातांचे वर्चस्व









