वृत्तसंस्था / बार्सिलोना
एटीपी टूरवरील येथे झालेल्या 2025 च्या टेनिस हंगामातील बार्सिलोना खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत डेन्मार्कच्या होल्गेर रुनेने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना स्पेनच्या द्वितीय मानांकीत कार्लोस अल्कारेझचा पराभव केला. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत रुनेचे हे पहिले विजेतेपद आहे.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रुनेने अल्कारेझचा 7-6 (8-6), 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. रुनेने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली असून त्याने अल्कारेझला तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्यापासून रोखले. अल्कारेझने यापूर्वी म्हणजे 2022 आणि 2023 साली सलग दोनवेळा या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले होते. या स्पर्धेत रुनेने उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेच्या कास्पर रुडचा पराभव केला होता.









