शिरीष गोगटे यांचे प्रतिपादन : बीएससीतर्फे अविनाश पोतदार, संगम पाटील यांचाही सत्कार
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचे नाव संपूर्ण देशात क्रिकेटपासून उज्वल करणारा व फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये 100 गडी बाद करून नाव लौकिक करणारा रोनित मोरेच आहे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे उद्योगपती शिरीष गोगटे यांनी केले. सध्याच्या होतकरू खेळाडूंनी चिकाटीने अभ्यासाबरोबर तितक्मयाच जोमाने क्रिकेटचा सराव करावा. आयपीएल क्रिकेटमुळे राज्य संघात व भारतीय संघात स्थान मिळविणे अतिशय कठीण आहे. त्यासाठी खडतर मेहनत, प्रशिक्षकांनी दिलेला कानमंत्र लक्षात ठेवूनच आपण सराव केला पाहिजे. तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो, असे ते म्हणाले. गॅलक्सी हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, कर्नाटक राज्यात अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले. पण त्यांना 100 गडी बाद करण्याचे शक्मय झाले नाही. हे बेळगावचा सुपूत्र रोनित मोरेने करून दाखविले आहे. होतकरू क्रिकेटपटू रोनितने घेतलेल्या मेहनतीचे धडे घेऊन आपण गिरविले पाहिजे. तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.
सत्कार प्रसंगी व्यासपीठावर अजित गरगट्टी, सत्कारमूर्ती अविनाश पोतदार, रोनित मोरे, युनियन जिमखान्याचे सचिव प्रसन्ना सुंठणकर, दीपक पवार, प्रकाश मिरजी आदी उपस्थित होते. प्रारंभी दीपक पवार यांनी प्रास्ताविक करून सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे शिरीष गोगटे यांच्या हस्ते रोनित मोरे, अविनाश पोतदार व बेळगावचे ज्ये÷ प्रशिक्षक संगम पाटील यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व भेटवस्तू प्रदान करुन गौरव करण्यात आला.
यावेळी अविनाश पोतदार म्हणाले, बेळगावच्या मातीत अनेक दिग्गज क्रिकेटपटू निर्माण झाले. पण त्यांना नशिबाने साथ दिली नाही. सुभाष कंग्राळकर, मुकुंद देसूरकर यासारखे अ÷पैलू खेळाडू राज्य स्तरावर पोहोचले. पण राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर, रोनित मोरेने आपले गुरू संगम पाटील व इतर प्रशिक्षकांचा मार्गदर्शनाने कर्नाटकाच्या संघात खेळताना 100 गडी बाद करण्याचा टप्पा ओलांडला आहे. हे कौतुकास्पद आहे. आपला फिटनेस कायम ठेवून रोनितने 200 गडी बाद करण्याचा टप्पा ओलांडावा.
यावेळी सत्कारमूर्ती रोनित मोरे म्हणाला बेळगाव स्पोर्ट्स क्लबने अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडविले आहेत. त्यामध्ये रोहन कदम, सुजय सातेरी, स्वप्निल हेळवे हे खेळाडू कर्नाटक संघात खेळून आले आहेत. अनेक क्रिकेटपटूंकडे क्षमता आहे. हे नक्कीच राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतात. बेळगाव स्पोर्ट्स क्लबने दिलेला कानमंत्र क्रिकेट कारकिर्दीत उपयुक्त ठरला आहे. होतकरू क्रिकेटपटूंनी चिकाटीने सराव व फिटनेसकडे लक्ष देवून आपला सराव नियमित करावा, तरच आपणाला यश मिळू शकते.
यावेळी उद्योगपती मल्लिकार्जुन जगजंपी, उमेश कलघटगी, संजय पोतदार, प्रभाकर हलगेकर, नंदू पाटील, पप्पू लेंगडे, समीर केशकामत, संजय सातेरी, बाळकृष्ण पाटील, विवेक पाटील, सुरेश गडकरी, अशोक अष्टेकर, अरूण पठाणे, शरद पै, श्रीकांत परब, ऍड. धनराज गवळी त्याचप्रमाणे बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी पालक, व क्रिकेटपटू मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दीपक पवार यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश मिरजी यांनी आभार मानले.









