मँचेस्टर / वृत्तसंस्था
मँचेस्टर युनायटेडचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या नवजात जुळय़ा अपत्यातील मुलाचे निधन झाल्याचे मंगळवारी जाहीर केले. रोनाल्डो व त्याची पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्यूज यांनी आपल्याला जुळय़ा अपत्याची प्रतीक्षा असल्याचे यापूर्वी सोशल मीडियावर म्हटले होते. रोनाल्डोने इन्स्टाग्रामवरुन नवजात अपत्याच्या निधनाचे वृत्त दिले. रोनाल्डोला यापूर्वी 4 मुले असून यात ख्रिस्तियानो ज्युनियर, मॅटेओ ही मुले आणि इव्हा व ऍलाना या मुलींचा समावेश आहे.
रोनाल्डोची सध्याची पार्टनर जॉर्जिना हिने यापूर्वी 2017 मध्ये कन्येला जन्म दिला आणि हे या दाम्पत्याचे पहिले तर रोनाल्डोचे चौथे अपत्य होते. त्यानंतर 2021 मध्ये या दाम्पत्याने आपण जुळय़ाच्या प्रतीक्षेत असल्याचे जाहीर केले होते.









