वृत्तसंस्था / हैद्राबाद
येथे झालेल्या कोटक पुरस्कृत इंडिया कनिष्ठांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सिरीजमधील स्पर्धेत रोनक चौहानने पुरुष एकेरीचे तर श्रीयांशी वालिशेट्टीने महिला एकेरीचे जेतेपद पटकाविले.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रोनकने नाना दत्तूचा 15-21, 21-13, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव करत या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी जेतेपद स्वत:कडे राखले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात श्रीयांशी वालीशेट्टीने अकिया शेट्टीवर 21-12, 21-8 अशा गेम्समध्ये मात करत विजेतेपद मिळविले. निरंजन नंदकुमार आणि युधजीत रे•ाr यांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविताना टॉपसिडेड जोडी भव्या-छाब यांचा पराभव केला. दीपकराज अदिती आणि पोनम्मा वृद्धी या जोडीने महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळविताना किर्ती मनचला आणि वेर्णा प्रभू यांचा 21-13, 21-17 असा पराभव केला. सदर स्पर्धा येथील कोटक पी. गोपिचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये खेळविली गेली. वेनाश देव आणि श्रवणी वालेकर यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविताना मिथीलेश कृष्ण्न व वेर्णा प्रभू यांचा 19-21, 21-16, 21-15 असा पराभव केला.









