वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
येथे सुरू असलेल्या विश्व जलतरण पात्रता स्पर्धेत पुरूषांच्या 100 मी. फ्रीस्टाईल प्रकारात रूमानियाचा 17 वर्षीय जलतरणपटू डेव्हिड पोपोविसीने मंगळवारी येथे पात्र फेरीत सर्वात जलद वेळ नोंदवित नवा विश्वविक्रम केला.
पोपोविसीने पुरूषांच्या 200 मी. फ्रीस्टाईल प्रकारात नव्या विश्वविक्रमासह आपल्या देशाला जेतेपद मिळवून दिले होते. मंगळवारी पुरूषांच्या 100 मी. फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात पोपोविसीने 47.60 सेकंदाची जलद वेळ नोंदविली. पुरूषांच्या 200 मी. मिडले जलतरण प्रकारातील पात्र फेरीमध्ये अमेरिकेच्या फॉस्टरस आणि कॅलीझ यांनी अग्रस्थान पटकाविले. फॉस्टरने शनिवारी या स्पर्धेत पुरूषांच्या 400 मी. मिडलेमध्ये रौप्यपदक पटकाविले होते.









