टी-20 वर्ल्डकप सराव सामना ः यजमान संघावर 13 धावांनी मात
पर्थ / वृत्तसंस्था
सूर्यकुमार यादवने आपला बहारदार फॉर्म कायम राखल्यानंतर भारतीय संघाने आयसीसी टी-20 वर्ल्डकपपूर्वी पहिल्या सराव सामन्यात पश्चिम ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटना एकादश (वाका इलेव्हन) संघाचा 13 धावांनी पराभव केला. वाका मैदानावर मागील तीन दिवस सराव करत असलेल्या भारतीय संघाने 6 बाद 158 धावा जमवल्या आणि प्रत्युत्तरात वाका इलेव्हनला 20 षटकात 145 धावांपर्यंत मजल मारता आली. रोहित शर्माच्या साथीला केएल राहुलऐवजी रिषभ पंत सलामीला उतरला होता.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 20 षटकात 6 बाद 158 (सूर्यकुमार यादव 35 चेंडूत 52, हार्दिक पंडय़ा 20 चेंडूत 29, दीपक हुडा 14 चेंडूत 22) वाका एकादश ः 145 (अर्शदीप 3-6, भुवनेश्वर 2-26, यजुवेंद्र चहल 2-10).









