वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माने मंगळवारी येथे मुंबई रणजी संघासमवेत नेटमध्ये जोरदार सराव केला. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघाच्या दारुन पराभवानंतर रोहीत शर्माच्या कप्तान बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाने रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांना राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळण्यास सांगितल्याने रोहीत आता 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेत सहभाग होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात रोहीत शर्माने तीन कसोटीमध्ये केवळ 31 धावा जमविल्या. त्यानंतर त्याला या कसोटी मालिकेतील शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात वगळण्यात आले होते. वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी रोहीतने बराचवेळ फलंदाजीचा सराव केला.









