प्रतिनिधी / बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आज बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. सीमाप्रश्नावर वाद निर्माण झाल्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीला रोहित पवार यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकास भेट दिली. कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. येळ्ळूर येथील जनतेशी त्यांनी संवाद साधला त्याचबरोबर बेळगावच्या जोतिबा मंदिरालाही त्यांनी भेट दिली.
या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. दरम्यान हा आपल्या अस्मितेचा लढा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सीमावासियांच्या भावनेशी मी सहमत आहे,असे रोहित पवार यावेळी म्हणाले.