महाराष्ट्रात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलयं. 28 वर्षानंतर कसब्यात भाजपचा पराभव झाला.कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धांगेकर11 हजार 40 मतांनी विजयी झाले तर, भाजपचे हेमंत रासनेंचा पराभव झाला.भाजपच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसने गुलाल उधळला आहे. रवींद्र धांगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. दरम्यान मविआच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलय.












