पुणे: २०२४ नंतरची वेळ ही युवकांची म्हणजे आमची आहे.त्यामुळे त्यावेळेचे सर्व निर्णय हे नवीन पिढी घेईल.ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे मार्गदर्शन असेलच. पण, काय पद, कसं करायचं, कुणाला करायचं याचा निर्णय नवीन पिढी घेईल असे वक्तव्य कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही कडक शब्दात टीकास्त्र सोडले.
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले,पदाने कितीही मोठं झालो तरी लोकांमध्ये राहण्याची शिकवण आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला दिली आहे. ती आम्ही स्वीकारली आणि आत्मसात केली आहे, त्या पद्धतीने आम्हीसुद्धा वागत आहोत.त्यामुळे जमिनीवर राहणं आम्ही शिकलेलो आहोत आणि आम्ही जमीन सोडून कधीही वागणार नाही असा टोला विरोधकांना लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले,लांबच्या राजकारणाचा विचार करताना मित्रांना आम्ही कधीही विसरत नाही. त्यामुळे आमदार अतुल बेनकेंसुद्धा माझ्याबरेाबर लांबचं राजकारण करण्यासाठी राहणार आहेत, असे सांगून रोहित पवारांनी भविष्यातील आपली दिशाच स्पष्ट केली.
Previous Article50 वर्षांचा घोडा झाला तरी त्याला गोळवलकर म्हणता येईना; शरद पोंक्षेचा राहुल गांधींना टोला
Next Article पन्हाळगडावर दारुपार्टी, शिवभक्तांकडून संताप व्यक्त








