Rohit Pawar : आज पुण्यातील अल्का चौकात विद्यार्थ्यांनी अराजकीय ‘साष्टांग दंडवत’ आंदोलन केलं. यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार हे सहभागी झाले होते. तसेच त्यांनी आंदोलन स्थळावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली होती.यावेळी फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन देखील दिले. यानंतर काही तासांतच शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली.यानंतर विद्यार्थ्यी आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उगाचच कुणी राजकीय श्रेय घेऊ नये यामागे मुलांचे कष्ट आहेत असा टोला राहित पवार यांनी पडळकर यांना लगावला.
विद्यार्थ्यांची मागणी सरकारने मान्य करताच पुण्यातील एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यानी जल्लोष केला.विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. पडळकरांचा पक्ष सत्तेत असून देखील ते आज सकाळी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते.यावरून रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासूनच लागू होणार हा निर्णय आज घेतला गेला तर त्याचं श्रेय मुलांना जातं. याआधी देखील मुलांनी आंदोलन केलं होतं. तेव्हाही मुलांच्या बाजूने निर्णय घेऊ असे सांगण्यात आले होते.तो निर्णय १५ दिवस झाले तरी घेतला गेला नाही. त्यानंतर पुन्हा मुलांना आंदोलन करावे लागले. हा निर्णय १५ दिवसांपूर्वी घेतला असता तर मुलांना अभ्यास करता आला असता.युवा जेव्हा आंदोलन करतो तेव्हा त्यामागं कारण असंत,राजकारण नसतं. याचा विचार करून निर्णय आधीच घेतला पाहिजे होता.पण काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.उगाचच कुणी राजकीय श्रेय घेऊ नये यामागे मुलांचे कष्ट आहेत असेही रोहित पवार म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








