नवी दिल्ली :
रोहित जावा यांनी मंगळवारी ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) चे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पदभार स्वीकारला आहे. सोमवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर निवृत्त झालेल्या संजीव मेहता यांची जागा जावा यांनी घेतली. मेहता जवळपास दशकभर एचयूएलच्या मुख्यस्थानी होते. जावा गेल्या एप्रिल 1 पासून एचयूएलचे अतिरिक्त संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्त होत काम करत होते. याअगोदरही ते युनिव्हर्सलशी संबंधित होते.
कंपनीच्या भागधारकांनी सोमवारी जावा यांची एडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यांचा वार्षिक पगार 21.43 कोटी रुपये असेल. त्यांना चालू आर्थिक वर्षात 4.83 कोटी रुपये वाहतूक भत्ताही मिळणार आहे.









