राधानगरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला इस्रोमध्ये शास्त्रज्ञ
कोल्हापूर
रोहीत लक्ष्मण पाटील यांची नुकतीच इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे. राधानगरी तालुक्यातील मालवे येथील तरुणाची इस्रोमध्ये निवड झाल्याने त्याच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.
रोहीत हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. इंजिनिअरींग ची डिग्री मिळाल्यानंतर तो एक प्रायव्हेट कंपनीत कार्यरत होता. दरम्यान कोव्हीड काळात त्याने इस्रोमध्ये जाण्याची तयारी सुरु केली. सध्या तो ओएनजीसी मध्ये कार्यरत आहे. “स्वतःवर विश्वास ठेवला तर नक्की यश मिळतच. मला मिळले आहे तुम्हालाही मिळेल”, अशी प्रतिक्रिय रोहीत पाटील यांनी दिली.
ईस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याचे मुख्य कार्यालय बेंगलुरू येथे आहे.








