अर्निंग एज चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : निना स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी अर्निंग एज चषक 12 वर्षाखालील आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनदिवशी रॉजर्स क्लबने निनाचा, लायाजने आनंदचा, बेळगाव स्पोर्टस क्लबने एसकेईचा तर युनियन जिमखाना अ ने ब चा पराभव करून विजयी सलामी दिली. रजत संभाजीचे, खांडू पाटील, कनिष्क वेर्णेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून नवीन शिरगावी, सरोजीनी शिरगावी, स्वप्नील हेळवे, समीर सलीमवाले, ताहीर सराफ, सलाम बाळेकुंद्री आदी मान्यवरांच्याहस्ते यष्टीचे पुजन व खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सामन्यात रॉजर्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 3 गडीबाद 199 धावा केल्या. त्यात अवनीश हट्टीकरने 5 षटकार 9 चौकारासह 88, रजत संभाजीचे 1 षटकार, 11 चौकारासह 60 धावा केल्या. निनातर्फे समर्थ व अफनान यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना निना अकादमीने 25 षटकात 6 गडीबाद 172 धावाच केल्या. त्यात समर्थ चिगरेने 8 चौकारासह 55, कृष्णा पिसेने 6 चौकारासह 35 धावा केल्या. रॉजर्सतर्फे सामी व मयांक यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केल्या.
दुसऱ्या सामन्यात लायाज क्रेकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 2 गडीबाद 168 धावा केल्या. त्यात खांडू पाटीलने 8 चौकारासह 69, वरदराज पाटीलने 1 षटकार 5 चौकारासह 48 धावा केल्या. आनंदतर्फे अद्वैतने 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीचा 25 षटकात 7 गडीबाद 155 धावाच केल्या. त्यात अमिर पठाणने 5 चौकारासह 50, आरूषने 2 चौकारासह 32 धावा केल्या. लायाजतर्फे यश, स्वयम, वरदराज व खांडु यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केल्या. तिसऱ्या सामन्यात एसकेईने प् 20.2 षटकात सर्व गडीबाद 71 धावा केल्या. त्यात शुभमने 14, तर आकाशने 12 धावा केल्या. बेळगाव स्पोर्टस क्लबतर्फे समर्थ तलवार, दक्ष, कनिष्क यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केल्या. त्यानंतर बेळगाव स्पोर्टस क्लबने 10.2 षटकात 1 बाद 72 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला त्यात सचिनने 22, दक्ष रायकरने 11 धावा केल्या. चौथ्या सामन्यात युनियन जिमखाना अ ने 25 षटकात 4 गडीबाद 235 धावा केल्या. त्यात साईराज पोरवालने 14 चौकारासह 88, महम्मद हमजाने 6 चौकारासह 48, अब्बासने 36 धावा केल्या. ब संघातर्फे अथर्वने 2 तर राघवने 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल करताना ब संघाचा डाव 21. 2 षटकात 104 धावा आटोपला. त्यात अथर्व गवळीने 18 तर मिथिलने 14 धावा केल्या. जिमखाना अ तर्फे अनिष्कने 2 गडीबाद केल्या.









