Rocky Aur Rani Ki Prem Kahani Teaser Out : बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने काल ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’या चित्रपटाचा टिझर आज रिलीज होणार अशी घोषणा केली. घोषणेनंतर या चित्रपटाच्या टिझरची उत्सुकता सर्वांना लागली होती. दरम्यान आज सकाळी ‘धर्मा प्रोडक्शन’च्या यूट्यूबर याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांनी टिझरला पसंदी दर्शवली आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत.याच बरोबर अभिनेते धर्मेद्र, अभिनेत्री जया बच्चन, अभिनेत्री शबाना आजमी सारखे दिग्गज या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
तुम क्या मिले, हम ना रहे हम, तुम क्या मिले या गाण्याने टिझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये कौटुंबिक नाट्य,रोमान्स,डान्स,भावना,संगीत दाखवण्यात आले आहे. 1 मिनट 19 सेकंदाच्या टीझरमधील रंगीबेरंगी दृश्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.आलिया-रणवीरची जोडी पाहण्यासाठी प्रक्षेकांना उत्सुकता लागली आहे.









