चिपळूण :
गुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर परशुराम घाटात उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंती एकापाठोपाठ एक कोसळू लागल्यानंतर त्या मागच्या कारणांचा शोध घेण्याने काम राष्ट्रीय गहामार्ग विभागाकडून सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्यासह गहागार्गच्या वरिष्ठ पथकाने शनिवारी घाटाची पाहणी केली. घाटात कोसळलेल्या भिंतीच्या ठिकाणी बोअर मारून रॉक टेस्टींग सुरू करण्यात आले आहे. या बाबतचा अहवाल टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (टीएनडीसीएल) म्हणजेच टेहरी या संस्थेकडे पाठवल्यानंतर ही संस्था पुढील उपाययोजना सूचवणार आहे.
यावर्षीच्या पावसाला प्रारंभ झाल्यानंतर परशुराम घाटात संरक्षक भिंतीसह भिंतीचा भराव वाहून गेल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हा घाट सर्वाच्या दृष्टीने डोकेदुखी बनला. त्यानंतर घाटात संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक वाटत असलेल्या भिंती पाडून तेथे गॅबियन भिंती उभारण्यासह विविध पर्यायावर विचार सुरू झाला. अशातच शनिवारी घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या खालील भागात रॉक टेस्टींगला सुरुवात करण्यात आली आहे.








