हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डी नीरो वयाच्या 81 व्या वर्षीही चित्रपटसृष्टीत सक्रीय आहेत. लवकरच ते चित्रपट ‘मीट द पॅरेंट्स’च्या चौथ्या भागात दिसून येणार आहेत. 2000 साली प्रदर्शित या चित्रपटात त्यांनीच मुख्य भूमिका साकारली होती. रॉबर्ट डी नीरो यांच्या नव्या चित्रपटाचे नावही बदलण्यात आले आहे.
रॉबर्ट डी नीरो आणि बेन स्टिलर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मीट द पॅरेंट्स’ फ्रेंचाइजीच्या चौथ्या चित्रपटाचे नाव ‘फॉकर इन-लॉ’ ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन हॅम्बर्ग यांनी केले आहे. जॉन यांनी पूर्वीच्या तीन चित्रपटांमध्ये सह-लेखक म्हणून काम केले होते. ‘फॉकर इन-लॉ’ हा चित्रपट 25 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
नव्या चित्रपटात गायिका एरियाना ग्रांडे देखील आहे. रॉबर्ट डी नीरो आणि बेन स्टिलर हे ‘मीट द पॅरेंट्स’ सीरिजच्या मागील दोन चित्रपटांचा हिस्सा राहिले आहेत. ही फ्रेंचाइजी 2000 साली सुरू झाली होती, ज्यानंतर 2004 आणि 2010 मध्ये ‘मीट द फॉकर्स’ आणि ‘लिटिल फॉकर्स’ या नावाने आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले. होते.









