Sangli Breaking : सांगलीत रिलायन्स ज्वेलरी या दुकानावर दरोडा घालून दुकानातील सर्व सोन्याचे दागिने लुटून दरोडेखोर पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती समजताच सांगली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे घटनास्थळी गर्दी झाली होती.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सांगलीत पोलीस मुख्यालयाजवळ रिलायन्स सराफी मॉल आहे. आज भरदिवसा अंदाजे तीन ते साडेतीन च्या दरम्यान दरोडा पडला. पाच ते सहा जणांच्या टोळीने गोळीबार करत पूर्ण शोरुम लुटले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपास चालु आहे. यासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत. यासाठी 8 पथके तयार करण्यात आली आहेत. जवळपास 80 टक्के माल चोरीस गेल्याचा अंदाज आहे . याबाबत खात्रीशिर माहिती नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी दिली. या घटनेचे सर्व फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
नेमकं काय घडलं
सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्सवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला.दरोडेखोरांनी गोळीबार करत अख्खे दुकान लुटले.दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बांधून घातले. संपूर्ण दुकान लुटून गोळीबार करत दरोडेखोर पसार झाले.या फिल्मी स्टाईल दरोड्याने सांगली जिल्हा हदरला आहे. सांगली-मिरज रस्त्यावर रिलायन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. या रस्त्यावरील एक झाड आज दुपारी तोडण्यात येत होते.त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.त्याचा फायदा घेत सहा ते सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला.
दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बांधून घातले.दुकानातील सर्व सोने आणि हिरे लुटले आहेत. यावेळी एका ग्राहकाने दुकानातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्राहकाच्या दिशेने दरोडेखोरांनी गोळीबार केला.तो थोडक्यात बचावला.मात्र शोरुमच्या तळमजल्यामध्ये पडून जखमी झाला आहे.दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले परंतु दुकानाबाहेर श्वान घुटमळले.दरम्यान, दरोडेखोरांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथक रवाना करण्यात आली आहेत.