लग्नाच्या तयारीत असणाऱ्या कुटूंबात चोरी झाल्याने हळहळ : दंगा केल्यावर ऊसाच्या पिकात चोरट्यांचे पलायन
वारणानगर/प्रतिनिधी
कोडोली – सैदापूर प्रमुख जिल्हा मार्गावर असणाऱ्या क॥ सातवे येथे गावच्या प्रवेश द्वाराजवळच रहाणाऱ्या कणसे कुंटूबात बुधवार दि. २७ रोजी पहाटे दीडच्या सुमारास मागील दाराचा कडी – कोंयडा उचकटून घरात प्रवेश करीत लॉकर मधील चार तोळ्याचे सोन्याचे जिन्नस, चांदी, रोख २ लाख २५ हजार व पॅन्टच्या खिशातील सुमारे चार हजार रूपये अशी सुमारे पावणे पाच लाख रू. अज्ञात चोरट्यानी लांबवले. चोरट्यानी तिजोरीचा लॉकर ड्राव्हर व दोन लेडोज पर्स बाजूच्याच २५ फूटावर असलेल्या ऊसाच्या शेतात नेऊन त्यातील रक्कम व ऐवज लांबवला व त्यातील साहित्य तिथेच विस्कटून टाकले आहे. याबाबतची वर्दी प्रविण बबन कणसे यानी तातडीने कोडोली पोलीसांना माहिती दिल्यावर काही वेळातच पोलीस तिथे हजर झाले.
सातवे गावच्या प्रवेशद्वाराबाहेरच रोड कडेला गोविंद कृषी केंद्राजवळ कणसे कुंटूंबीय रहातात ते पहाटे गाढ झोपेत असतानाच चोरट्यानी घरात प्रवेश केला. यावेळी त्यानी तिजोरीला लागून असलेल्या फ्रीज मधील आईस्क्रीमसह इतर पदार्थ खाल्ले तसेच लॉकरचा ड्राव्हर बाहेर घेवून चालले होते वर्दीदार प्रविण कणसे घरी बाहेरील खोलीत झोपले होते तिथे त्यांची अडकवलेली पॅट मधील ३ते ४ हजार रू. चोरट्या मी जाताना लांबवले.
दरम्यान तिजोरी व फ्रीज असणाऱ्या खोलीत झोपलेल्या वर्दीदार यांचे तहान भाऊ संतोष कणसे यांच्या पलीस जाग आली त्यावेळी त्यांना दोन चोरटे दिसले तोंडाला काळ्या पट्या,पॅन्ट शर्ट व एकजन अडंर वेअर बनेल वर असलेला त्यानी पाहिला आरडा ओरड करीत त्यानी त्यांचा पाठलाग सुरू केल्यावर उंच ऊसाच्या पिकात शिरत चोरटे पलायन करण्यात यशस्वी झाले. दंगा झाल्याने आजू बाजूचे लोक घटनास्थळी पोहचले तो पर्यन्त पोलीस देखील पोहचले चो१ट्याना पकडण्याची केलेला प्रयत्नही निष्कळ ठरला.
लग्न असलेल्या कुंटूंबात चोरी झाल्याने हळहळ
कणसे कुंटूबातील कन्येचा विवाह सोहळा येत्या काही दिवसात पार पडणार आहे यासाठी त्यांनी सोने, चांदीच्या वस्तूची खरेदी केली होती इतर तयारी साठी त्यानी कालच मंगळवार दि.२६ बँकेतून रोख २ लाख २५ हजार रू. काढून घरी आणले होते सोन्या चांदीच्या आजच्या बाजारभावाने व रोख रक्कम असा ४ लाख ७५ हजार रू. च्या रक्कमेवर चोरट्यानी डल्ला मारला आहे. घरात कन्येच लग्न तोंडावर असताना झालेल्या चोरीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
चोरटे माहितगार असावेत
कणसे कुटूंबात चाललेली लग्नाची तयारी व त्या निमीत्ताने सोने चांदी खरेदी असेल तसेच काल बँकेतून मोठी १क्कम काढून आणलेली पक्की खबर लागल्यानेच ही चोरी पहाटे पर्यन्त झाली तसेच तपासाला तातडीने दिशा निळावी यासाठी मदत घेतलेला श्वान घराभवोती व जवळच्या चौकापर्यन्तच गुटमळला त्यामुळे चोरटे जवळ्चेच माहितगार असावेत अशी चर्चा सुरू झाली आहे.
शाहूवाडी उपविभागाचे पोलीस उपअधिक्षम अनिल सांळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्ष्क शितलकुमार डोईजड यानी गतीने तपासाला सुरवात केली आहे या घटनेचा तपास पौजदार सागर पवार करीत आहेत या प्रकरणी प्राथमिक वर्दी प्राप्त झालेवर तपास सुरू केला आहे अद्याप गुन्हा नोंद झाला नसल्याचे स.पो.नि. डोईज यानी सांगीतले.