प्रतिनिधी,आजरा
Robbery In Raiwada : चित्री धरणग्रस्त वसाहत असलेल्या रायवाडा येथे मंगळवारी मध्यरात्री सशस्त दरोडा पडला. प्रल्हाद गुरव यांच्या घरातील दागिणे ,काजूगर,रोकड तसेच १५० च्यावर पाळीव डुकरे असा १० लाखांचा माल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
आयशर टेंपोमधून आलेल्या १५ ते २० जणांच्या टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवून गुरव यांच्या घरावर दरोडा टाकला. प्रल्हाद यांच्यासह पत्नी पूनम तसेच राजेश गुरव यांना खुर्च्यांना बांधून घालून त्याच्याकडील मोबाईल काढून घेतले. त्यामुळे या दरोड्यावेळी कोणाशी संपर्क साधणेही गुरव यांना शक्य झाले नाही.घडलेल्या प्रकाराने गुरव कुटुंबिय हादरले आहे.बुधवारी सकाळी पोलीसांनी घटनास्थळी माहिती घेतली.यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
Previous Articleसांखळी पालिका निवडणूक रंगतदार ठरणार
Next Article दुसऱ्या दिवशीही उमेदवारी अर्ज नाही









