प्रतिनिधी,रत्नागिरी
Ratnagiri Crime News : वडापच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या वृद्धाला वडाप चालकासह ड्रायव्हर व दोन संशयितांनी लुटले.या तिघांनी वृद्धाच्या बॅगमधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 2 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना मंगळवार ( ता.18 ऑक्टोबर) रोजी सकाळी घडली. रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते पावस एसटी स्टँड या प्रवासादरम्यान घडली आहे.
याबाबत सुरेश दत्ताराम रसाळ (वय-65, मुळ रा.निरुळ तेलीवाडी,रत्नागिरी,सध्या रा.भाईंदर,मुंबई) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.या मध्ये एक सोन्याचा हार,कानातील कुड्या,अंगठी,कानातील रिंग,सोन्याचा काॅईन आणि रोख रक्कम 50 हजार रुपये असा एकूण 2 लाख 66 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.
Previous Articleके.एल.ई डॉ.प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये यशस्वी लिव्हर प्रत्यारोपण
Next Article खासगी ट्रव्हल्सच्या दरात दुपटीने वाढ









