प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील शाहुपूरी येथील हिंदवी पब्लिक स्कूलच्या कॉर्नर पंचपोर दवाखान्याच्या समोरच्या दुकानात दुकान मालकांस तोंडाला मास्क लावलेल्या चौघांनी मारहाण करत जोगाराम भारताराम चौधरी (वय 23, रा. राजस्थान) याच्या गळ्यास चाकू लावून गळ्यातील पाचशे रूपयांची रेक्झीनची कापडी बॅग चोरून नेल्याची घटना दि. 19 रोजी रात्री 9.10 वाजता घडली. यावरून अनोळखी चौघांविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जोगाराम चौधरी याने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पंचपोर दवाखान्याच्यासमोर असलेल्या दुकानासमोर एक नंबर झाकलेली इंडिका आली. त्या कारमधून 25 ते 30 वयोगटातील चौघे उतरले. त्यांनी दुकान मालक वालाराम चौधरी यांची कॉलर पकडत मारहाण करणार एवढ्यात जोगाराम हा त्यांना सोडविण्यासाठी गेला असता त्या चौघांनी त्याचा हात पकडला. गळ्याला चाकू लावून लॉकरच्या व दुकानाच्या चाव्या असलेली काळ्या रंगाची गळ्यात अडकवलेली 500 रूपयांची बॅग चोऊन नेली. त्यातील एकाने ग्रे कलरचा हाफ बाह्याचा शर्ट घातला होता. तर त्याचा अशोक जीवराम चौधरी याच्या गळयाला कोयता लावला होता. या प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे तपास करत आहेत.







