खड्डे बुजविण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांना नाहक त्रास : काम पूर्ण करण्यास दोन-तीन महिने लागणार
कणकुंबी : बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यापैकी रणकुंडये ते चोर्ला या रस्त्याच्या दुऊस्तीच्या कामाला प्रारंभ झाला असला तरी चिखले क्रॉसपासून चोर्लापर्यंतच्या रस्त्याच्या दुऊस्तीचे काम गेल्या आठ दिवसापासून रेंगाळले आहे. शनिवार दि. 11 मार्चपासून दुऊस्तीचे काम थांबविण्यात आल्याने पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशीच काहीशी अवस्था चोर्ला रस्त्याच्या बाबतीत झाली आहे. चोर्ला स्त्यावरील रणकुंडये ते चिखले क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावरील मोठेमोठे खड्डे बुजवण्यात आले असले तरी अनेक लहानसहान खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच चिखले क्रॉस ते चोर्लापर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम गेल्या आठ-दहा दिवस अतिशय संथगतीने सुरू होते. त्यामुळे वाहनधारक व प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यावरील जीवघेणे खड्डे पाहता या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे अत्यंत धोकादायक बनले होते. वास्तविक पावसाळ्यापासून खड्डे बुजवण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स, शिवप्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष किरण गावडे व इतर व्यापारी संघटनांनी वेळोवेळी रस्त्याच्या दुऊस्तीसाठी आवाज उठविला. त्यानंतर प्रशासनाने 2.75 कोटी ऊपयांच्या निधीतून बेळगाव-चोर्ला-पणजी या रस्त्यापैकी रणकुंडये ते चोर्ला हद्दीपर्यंत खड्डे बुजवण्यासाठी पॅचवर्कच्या कामाला सुऊवात झाली आहे. सदर रस्त्याच्या दुऊस्तीचे काम धारवाडच्या व्यंकटेश कंपनीने घेतलेले असून रणकुंडये क्रॉसपासून जांबोटी चिखले क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावरील मुख्य खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच कुसमळीजवळील मलप्रभा नदीवरील पुलावरील खड्डे सुद्धा बुजवण्यात आले आहेत. तरी उर्वरित चिखले क्रॉसपासून ते चोर्ला गावापर्यंत म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. तसे पाहता चिखले क्रॉसपासून गोवा हद्दीपर्यंतचा रस्ता अतिशय धोकादायक बनलेला असूनही या रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यास जाणूनबुजून विलंब करण्यात येत आहे. खराब झालेल्या ठिकाणचा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उखडून काढून काही ठिकाणी त्यावर खडी पसरवण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा वेग पाहता गोवा हद्दीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्यास किमान दोन-तीन महिने लागण्याची शक्मयता आहे.









