आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाले रस्ते
Roads in Malvan taluka restored due to Yuva Sena agitation – Amit Bhogle
कुडाळ – मालवण, बेळणे-राठिवडे- मालवण, ओझर- कांदळगाव-मसुरे, कणकवली आचरा हे मालवण तालुक्यातील रस्ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतले होते.दोन वर्षे हे रस्ते ठेकेदाराच्या दिरंगाई मुळे रखडले होते. त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना त्रास होत असल्याने हे रस्ते तात्काळ दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मालवण तालुका युवासेनेने ठेकेदाराला आणि अधिकाऱ्यांना दिला होता. युवासेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे मालवण तालुक्यातील सदर रस्ते पूर्ववत करण्यात आले आहेत. त्यामुळे आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांचा प्रवास देखील यामुळे सुखकर होणार आहे. हे रस्ते मंजुरीचे पूर्ण श्रेय आ. वैभव नाईक आणि महाविकास आघाडी सरकारचे आहे. त्यामुळे फुकाचे श्रेय कोणी घेऊ नये असा इशारा मालवण युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले यांनी दिला आहे.
मालवण (प्रतिनिधी)









