तब्बल आठ वर्षे रस्त्यांचे काम अडून
फोंडा : मंदिर पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या फोंडा तालुक्यातील कवळे व बांदोडा पंचायत क्षेत्रातील रस्ते म्हणजे वाहनचालकांच्या डोक्याला ताप बनलेले आहेत. या भागातील कुठलाही रस्ता धरा, पावलो पावली पडलेल्या ख•dयांशिवाय वाहने हाकताच येत नाहीत. संतापजनक प्रकार म्हणजे खराब रस्त्यांची ही समस्या एक दोन वर्षांची नसून तब्बल आठ वर्षे या भागातील नागरिक तोंड दाबून रस्त्यांवरील धक्क्यांचा हा मार सोसत आहेत. सुऊवातीला मलनिस्सारण प्रकल्पासाठी खोदण्यात आलेले रस्ते आणि या वर्षी ऐन पावसाच्या तोंडावर हाती घेण्यात आलेले भूमिगत विजवाहिन्यांचे काम यामुळे आणखी एक संपूर्ण पावसाळा येथील लोकांना ख•sमय रस्त्यांवऊन प्रवास चुकलेला नाही.
फोंड्याहून कपिलेश्वरीमार्गे दुर्भाटकडे जाणारा मुख्य रस्ता, तसेच दोन खांबऊन कवळे, गाळाशिरे किंवा रामनाथी, रायंगिणी, बांदोडा, उंडिर, नागेशी, गावणे, याशिवाय काशिमठमार्गे कदंब बसस्थानकाकडे जाणारा रस्ता, यापैकी कुठल्याही मार्गाने प्रवास करा पावलोपावली रस्त्यांची झालेली वाताहत दिसेल. काही ठिकाणी खोदकामामुळे तयार झालेले उंचवटे, मलनिस्सारण वाहिन्यांसाठी खोदलेल्या चेंबर्सची वर आलेली लोखंडी डोकी, दगड मातीमुळे कृत्रिम गतिरोधक किंवा मधोमध तयार झालेले चर अशी एकंदरीत या रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. मागील महिनाभर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या रस्त्यांची अधिकच दैना झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाने विसावा घेतल्याने ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्याची समस्या ओसऊन धूळ प्रदूषणाला सुऊवात झाली आहे. या रस्त्यावऊन दिवसाकाठी मोठ्याप्रमाणात रहदारी सुऊ असते. वास्को, वेर्णा अद्योगिक वसाहतीकडे जाणारे कामगार तसेच गॉमेकॉत जाणारे कर्मचारी व ऊग्णही दुर्भाट, आडपई किंवा मडकई फेरीबोट मार्गाने याच रस्त्यांवऊन प्रवास करतात. वाडी-तळावली, दुर्भाट, कवळे, बांदोडा, मडकई या पंचायत क्षेत्रातील नागरिकांना फोंडा शहराकडे ये जा करण्यासाठी याच मार्गाने वाहतूक करावी लागते. त्यात शाळकरी मुले, त्यांना सोडायला जाणारे पालक व अन्य प्रवाशांना खराब रस्त्यांमुळे धक्के खात प्रवास करावा लागत आहे. तब्बल आठ वर्षे ही समस्या कायम असून छोट्यामोठी अपघातांबरोबरच अनेकांना आता मानेचे व कंदबदुखीचे आजारही सुऊ झाले आहेत. गरोदर महिला व आजारी लोकांसाठी तर हे रस्ते अधिकच असुरक्षित बनून राहिले आहेत. मलनिस्सारण प्रकल्पाचे काम अजून संपुष्टात आलेले नाही. शिवाय भूमिगत वीज वाहिन्यांचे कामही वर्षभर चालणार असल्याने काही रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाला मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात काम केव्हा सुऊ होईल, याबाबत अनिश्ंिचतता आहे.
येत्या पंधरा दिवसांत श्रावण महिन्याला सुऊवात होणार आहे. चतुर्थीनंतर लगेच नवरात्रोत्सवालाही सुऊवात होणार आहे. त्यामुळे कवळे बांदोडा परिसरातील मोठ्या मंदिरामध्ये संपूर्ण गोव्यातून भाविकांची वर्दळ वाढणार आहे. नवरात्रोत्सवानंतर लगेच पर्यटन हंगामाला सुऊवात होईल. तोपर्यंत या रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण शक्य नाही. सध्या बांदोडा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात कैवल्य मठाधीश शिवानंद सरस्वती स्वामीजींचा चातुर्मास सुऊ आहे. त्यांच्या दर्शनालाही विविध भागातून भाविक उपस्थिती लावित आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांबरोबरच भाविक व पर्यटकांनाही खराब रस्त्यांचा त्रास चुकलेला नाही.
फोंडा शहरातील रस्त्यांचीही दुर्दशा
दरम्यान फोंडा शहरातील पणजीकडे जाणारा मुख्य रस्ता, तसेच वारखंडे व अन्य भागातील रस्त्यांचीही वाताहत सुऊ झाली आहे. वर्षभरापूर्वी हॉटमिक्स करण्यात आलेल्या रस्त्यांवरील खडी उखडली असून बऱ्याच ठिकाणी ख•dयांनी डोकी वर काढली आहेत. आल्मेदा हायस्कूलकडून वारखंडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मलनिस्सार प्रकल्पाच्या चेंबर्सची लोखंडी झाकणे वर डोकावत आहेत. तर वारखंडे हनुमान मंदिर ते पंडितवाडा रस्त्यावरील खडी उखडली आहे. या रस्त्यावऊन दुचाक्या हाकताना तोल जात आहे. अवघ्या वर्षभरात हॉटमिक्स केलेल्या या रस्त्याची खडी उखडू लागल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.









