‘ तो’ फोटो परत आणून देण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
कोनेवाडी (ता. बेळगाव) येथील एका कार्यकर्त्याने लोकप्रतिनिधीला वादग्रस्त फोटोची फ्रेम तयार करून देण्याच्या कृतीमुळे समस्त शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे रविवारी सकाळी बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावरील सुळगा (हिं) येथे रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सर्व शिवभक्तांना ताब्यात घेतले. त्यामुळे शिवभक्तांतून आणि मराठी बांधवांतून संताप व्यक्त होत आहे.
कोनेवाडी येथील कार्यकर्त्याने सदर वादग्रस्त फोटो फ्रेम लोकप्रतिनिधीला दिली आहे. त्यामुळे शिवभक्तांतून संताप व्यक्त होत आहे. या कृतीचा पंधरा दिवसांपासून शिवभक्त निषेध करत आहेत.
संबंधित कार्यकर्त्याला याबाबत सूचना करण्यात आली असून त्यांनी सदर फोटो उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर आणून ठेवावा आणि सर्वांसमोर माफी मागावी, अशी सूचना दिलेली होती. मात्र त्यांनी तसे न केल्यामुळे शिवभक्तांनी सुळगा येथे बेळगाव-वेंगुर्ला रस्ता बंद करून उद्रेक व्यक्त केला. सकाळपासूनच काकती पोलीस त्या ठिकाणी तळ ठोकून होते. आणि मोठ्या फौजफाट्यासह पोलीसप्रमुख रवींद्र गडादी आणि पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्तारोकोनंतर तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काकती पोलीस स्टेशनला नेले. या घटनेमुळे शिवभक्तांतून आणि मराठी भाषिकांतून संताप व्यक्त होत आहे. तो फोटो त्वरित आणून द्यावा, अशी मागणी शिवभक्तांतून होत आहे.









