बेळगाव: उद्या दि ४ डिसेंबर पासून बेळगाव सुवर्णसौध येथे कर्नाटक राज्य सरकारच्यावतीने हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही याच्या विरोधात उद्या दिनांक 4.12.2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र मेळावा होऊ नये या दृष्टिकोनातून बेळगाव शहर परिसरात 144 कलम लागू केलेले आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून मेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे. आज मैदानाची पाहणी करण्यासाठी समितीचे नेते गेले असता त्यांना मेळाव्याला परवानगी नाकारल्याचे पत्र देण्यात आले आहे. याची दखल घेऊन आज दिनांक 3 12-2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेऊन शिनोळी येथे रास्ता रोको कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले आहे. उद्या दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता बेळगाव खानापूर निपाणी व इतर भागातील कार्यकर्त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ जमावे असे आवाहन समितीने केले आहे हुतात्मा स्मारकाला वंदन करून सकाळी 11 वाजता रास्ता रोको कार्यक्रमाला शिनोली येथे सुरुवात करावयाची आहे या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हे महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन