दोन दिवसातच रस्ता उखडला
न्हावेली / वार्ताहर
आरोस बाजार ते न्हावेलीला जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम दोन दिवसापूर्वी सुरू झाले. आणि दोन दिवसातच रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या यामुळे कंत्राटदाराने घातलेली खडी वर येवून रस्त्यात खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पहिला थर लावताना डांबर न वापरल्यामुळे दोन दिवसातच रस्ता उखडला गेला आहे. याची पाहणी दांडेली गावाचे सामाजिक कार्यकर्ते श्री दुर्गेश मोरजकर, प्रदीप गावडे ,शंकर म्हाडगुत ,बाळा राम मोरजकर यांनी केली. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग याची दखल घेवून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.









