वार्ताहर /किणये
सावगाव येथील रामदेव गल्लीतील रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शुक्रवारी रस्त्याच्या कामकाजाचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. गावातील हा महत्त्वाचा रस्ता होणार असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक संतोष पाटील यांनी करून सदर रस्ता हा आमदार फंडातून करण्यात येणार असून यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत, असे सांगितले. बेनकनहळ्ळी क्रॉस, नानावाडीकडे जाणाऱया रस्त्याजवळच्या वळणापासून सावगावमधील रामदेव गल्लीचा हा रस्ता करण्यात येणार आहे. गावातील लक्ष्मी मंदिरापर्यंत रस्ता करण्यात येणार आहे. एन. के. पाटील, बाळू पाटील, मायाप्पा घाटेगस्ती, गणपत काकतकर, नेताजी मुंगाळे, कृष्णा मुंगाळे, संगिता बाणेकर, गीता सावगावकर, कल्लाप्पा पाटील, परशराम अकनोजी, नंदा काकतकर, भुजंग कोरजकर, यल्लाप्पा पाटील, परशराम पाटील आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.









