अतिपावसाचा परिणाम : ग्रामस्थांची गैरसोय
बेळगाव : सातत्याने कोसळणाऱ्या पावसाचा फटका कर्ले येथील स्मशानभूमीच्या कामात व्यत्यय आणणारा ठरला आहे. पावसामुळे येथील रस्ता वाहून गेल्याने गावकऱ्यांची गैरसोय झाली आहे. कर्ले परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाने झोडपल्याने परिस्थिती बिकट झाली. याशिवाय डोंगराळ भागातील पाणी इथेच जमा होते. पाण्याचा जोर वाढल्याने स्मशानभूमीचा रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 40 लाखांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, रस्ताच वाहून गेल्याने याचा फटका गावकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.









