पर्यटकांमधून नाराजी ; प्रशासन लक्ष देणार ?
वेंगुर्ले –
वेंगुर्ले ते खवणे समुद्र रस्ता अत्यंत खराब झाल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते व्हावे अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे वेंगुर्ला ते खवणे रस्त्याची चाळण झाल्याने परराज्यातून आणि सिंधुदुर्गमधील पर्यटकांना, दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वेंगुर्ले बंदर आणि झुलता पूल येथील रस्ता खड्डे मुक्त बनविला आहे त्यामुळे बंदर बघण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. गोव्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे पर्यटन स्थळी जाणारे रस्ते रुंद आणि अत्यंत चांगल्या दर्जाचे बनवले आहेत त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनामध्ये भर पडावी असे जर प्रशासनाला वाटत असेल तर जिल्ह्यातील पर्यटन स्थळी पोचण्यासाठी असणारे रस्ते खड्डे मुक्त करावेत अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.









