कास :
किल्ले सज्जनगडावरील वाहनतळाच्यावरती बनवण्यात आलेल्या रस्त्याच्या वरील बाजूचा डोंगरातील भाग खचून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली असून आणखी काही ठिकाणी भराव खचत आहे.
सज्जनगड परिसरात अतिवृष्टी सुरू असून रस्त्यावरही झाडे उन्मळून पडणे तसेच मोठमोठे दगड वाहून येणे असे प्रकार होत आहेत. गडावरील वाहन तळापासून अंगलाईदेवी मंदिराच्या खालील बुरुजापर्यंत रस्ता बनवण्यात आला आहे. या रस्त्याच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरातील भराव खचत आहे. हा भराव खचून मोठी दुर्घटना होण्याची ही शक्यता आहे. प्रशासनाने या वर उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाविकांकडून होत आहे.








