शिरोळ प्रतिनिधी
२ ऑक्टोंबर पर्यंत रस्त्याचे काम सुरू न केल्यास महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी युवा संघटनेचे नेते सौरभ शेट्टी यांनी दिला महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे उपअभियंता एन के कांबळे यांनी एक महिन्याच्या आत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे लेखी दिल्यानंतर रस्ता रोखो आंदोलन मागे घेण्यात यावेळी जि प चे बांधकाम विभागाचे उपअभियंता बदडे हे उपस्थित होते रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजू कडील दोन किलो मीटर पर्यंतवाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
शिरटी घालवाड कुटवाड कनवाड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिरटी ग्रामस्थांच्या वतीने शिरटी घालवाड ते शिरोळ हा रस्ता त्वरित करावा या मागणीसाठी शिरोळ नरसिंहवाडी या मुख्य मार्गावरील जनता हायस्कूल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते आंदोलनकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करून शासनाच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा दिल्या जात होत्या हसुर शिरटी येथील नागरिकांना महापुराच्या काळात शिरोळला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे या रस्त्यावरून चालत जाणे देखील मुश्किल झाले आहे गेली पाच वर्षे झाली हा रस्ता करावा म्हणून वेळोवेळी आंदोलन केली लेखी मागणी केली परंतु शासनाने दखल घेतली नाही हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे परंतु अद्याप कामास सुरुवात करण्यात आलेला नाही. यावेळी बोलताना माजी सरपंच राहुल सूर्यवंशी म्हणाले की शिरटी ते घालवाड या हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.
याच रस्त्यावर हायस्कूल महावीर नगर शेती असल्याने शेकडो लोक या रस्त्यावरून ये जा करीत असतात या रस्त्यावर चालत जाणे देखील मुश्किल झाले असून संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करूनही आश्वासना पलीकडे काही पदरात पडले नाही तातडीने रस्ता दुरुस्त करावा यासाठी हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून लवकरच या कामात सुरुवात करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी दहा वाजता शिरटी कनवाड कुटवाड घालवाड मार्गे मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी माजी उपसरपंच सागर पवार सतीश चौगुले आलम मुलांनी सुनील माळी रामचंद्र कोगनोळे रमेश मोरे महेश हत्ती सतीश चौगुले सुनील माळी राजकुमार शिरगावे प्रकाश माळी वैभव पवार रोहन पवार दीपक मगदूम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते शिरोळ पोलीस ठाण्याचे पीएसआय विश्वास कुरणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,,,









