वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील न्यू वैभवनगरमधील रस्ते काँक्रीटीकरण व गटारी काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सदर कामांसाठी मंत्री हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून मायनॉरीटी फंडातून 10 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी न्यू वैभवनगर नागरिकांतर्फे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा, उपाध्यक्षा दिपा पम्मार व इतर सदस्यांच्या हस्ते पूजन झाले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कुदळ मारून विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सदस्य दत्ता पाटील, बंदेनवाज सय्यद, सकेप्पा राजकट्टी, दादासाहेब भदरगडे, जयराम पाटील, उमेश पाटील, वेदीका पठाणेसह ग्रामस्थ उपस्थित होते.









