न्यूयॉर्क :
अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात झालेल्या रस्ते दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. संबंधित बसमधून 53 जण प्रवास करत होते. एका खासगी कंपनीसाठी काम करणारे स्थलांतरित कामगार हे या बसमधून प्रवास करत होते. त्यांना शेतीच्या कामासाठी नेले जात असताना बस पलटली आहे.









