वृत्तसंस्था/ पाटणा
राजदची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक 18 जानेवारीला पाटणा येथे होणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला कार्यकारिणीशी संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. आरजेडीचे प्रधान सरचिटणीस अब्दुल बारी सिद्दीकी यांनी यासंबंधी माहिती शेअर करताना सांगितले. ही बैठक पाटणा येथील हॉटेल मौर्य अशोक हॉल (लोकनायक जयप्रकाश नारायण सभागृह) येथे होणार आहे. या बैठकीत पक्षाची भविष्यातील दिशा आणि निवडणुकीची रणनीती यावर महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. तसेच आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीचाही विचार करण्यात येणार आहे.









