वृत्तसंस्था / कटक
2024 च्या येथे झालेल्या ओदिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ऋत्विक संजीव सतीशकुमारने पुरुष एकेरीचे जेतेपद मिळविताना तरुण मनपल्लीचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्याअंतिम सामन्यात 21 वर्षीय ऋत्विक तरुण मनपल्लीचा 21-18, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये 43 मिनिटात पराभव करत जेतेपद मिळविले. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या बॅडमिंटनटूरवरील सुपर 100 दर्जाच्या स्पर्धेत ऋत्विकने जेतेपद मिळविले आहे.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीन प्रजासत्ताकच्या केई येनने भारताच्या 15 वर्षीय तन्वी शर्माचा 21-14, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना 35 मिनिटे चालला होता. या स्पर्धेत तन्वीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या आठवड्यात झालेल्या गुहाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत चीन प्रजासत्ताकच्या येनने जेतेपद मिळविताना भारताच्या अनमोल खराबचा पराभव केला होता. ओदीशा मास्टर्स स्पर्धेत चीनच्या हुवांग डी. आणि लियु यांग यांनी पुरुष दुहेरीचे तर जपानच्या नानोका हेरा आणि रिको कियोसी यांनी महिला दुहेरीचे जेतेपद पटकाविले. चीनच्या गावो झुआन आणि तेंग झी यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद मिळविले.









